• आपल्या स्वागतासाठी सुसज्ज असे महाद्वार तसेच त्यावरील नगारखाना.

 • झिम्मा, फुगडी, मंगळागौरीचे खेळ, लपाछपी, खांबखांब खांबोळी, लंगडी इत्यादी खेळ खेळण्यासाठी पाचख़ाणी चौक.

 • पारंपारिक पद्धतीची चूल असलेले स्वयंपाकघर व त्या लगतचे माजघर.

 • जुन्या पद्धतीचे लाकडी बिन्नीचे दरवाजे व कमानीच्या खिडक्या तसेच लाकडी पलंग, दिवाण, मेज (डेस्क) तसेच लाकडी खुर्च्यांनी व काचेच्या हंड्यांनी सुसज्ज आणी कोळवण खो-याचे विहंगम दृश्य दिसणा-या ( व्हॅली व्हू ) खोल्या.

 • लाकडी खांब नक्षीच्या कमानी, काचेच्या हंड्या, नक्षीदार छत, अश्या पारंपारिक अंतर्गत सजावटीने सुसज्ज सातखणी दिवाणखाना.

 • पत्ते, काचापाणी, सापशीडी इत्यादी खेळ खेळ्ण्याठी माजघर, सोपा.

 • पाणी शेंदण्याची मजा लुटण्यासाठी खास विहीर व रहाट.

 • बंब, घंगाळ, पाण्याचा पाट, चौरंग, ह्या वस्तूंनीयुक्त पुर्वीसारखे न्हाणीघर!

 • जातं, उखळ, चुल, मांडणी, मोठी ताकाची रवी इत्यादींचा अनुभव घेण्याची व सोबत फोटो काढण्याची सोय.

 • पर्यटकांच्या कलागुणांना वाव मिळावा ह्यासाठी खुल्या रंगमंचाची सोय.

 • एकत्र गप्पा मारण्यासाठी बाकांची तसेच पारांची सोय.

 • आपल्या पारंपारिक झाडांची ओळख व्हावी ह्यासाठी झाडांवर लिहीलेली नावे.

 • मुलांना वाचनासाठी, अभ्यासासाठी विषेश जागा.

 • मुलांना गोष्टी सांगण्यासाठी, एकत्र खेळण्यासाठी अंगण.

 • सकाळच्या व सायंकाळच्या प्रार्थनेसाठी देवघर.

 • पक्षी निरीक्षकांसाठी उत्तम जागा.

 • पायवाटेने डोंगर ऊतरुन गावाला भेट देणे. ( सशुल्क ).

 • एप्रिल, मे महिन्यात मिळणारा जांभूळ, करवंद इ. रानमेवा.

 • पावसाळ्यात ढेपे वाड्यासमोरील डोंगरावरुन अखंड वाहणारे धबधब्यांचे व मागील बाजूला ढगांनी आच्छादलेल्या कोळवण खो-याचे विहंगम दृश्य.

 • लहान मुले व मोठ्यांना वाचायाला मराठी व इंग्रजी पुस्तके, विविध आर्टवर्क करण्यासाठी विशेष पुस्तके व कागद.

 • मुलांसाठी झोपाळे, पतंग, टायर खेळणे, आबादुबी, आकाश कंदील बनवणे, किल्ला बनवणे, डब्बा ऐसपैस इत्यादी पारंपारिक खेळ.

 • सुरपारंब्या, लगोरी, विट्टी-दांडू, गोट्या, भोवरा, सारीपाट, मामाच पत्र हरवलं, झोपाळे, टिपरीपाणी, दोरीच्या उड्या, लेझीम यांसारख्या खेळांची मजा अनुभवणे.

 • कॅरम, पत्ते, बॅडमिंटन, क्रिकेट हे मैदानी खेळ तसेच व्यायामासाठी डबल बार, सिंगल बार, वजणे उचलणे, नवा व्यापार, बुध्दीबळ, हाउझी, उनो, लुडो इत्यादी नवे खेळ.

 • पारंपारिक पोषाखात फोटो काढण्यासाठी ( सशुल्क ) पोषाख उपलब्ध.

 • पहाटे मंद आवाजातील भूपाळ्या व दिवसा ( काही वेळ ) मराठी संगीत.

 • रॉक क्लायबिंग, आर्चरी बर्माबीज, रायफल शुटींग, कमांडो रोप, झीपलाईन इत्यादी अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टसाठी गिरीवनमध्ये असलेली ( सशुल्क ) सेवा.

 • ढेपे वाड्याच्या आजूबाजूला असलेली व आवर्जुन भेट द्यावी अशी ठिकाणे :-
  अ) हाडशीचे सत्यसाईबाबा मंदिर
  ब) चिन्मय विभुती
  क) वाळेण व पवना धरण
  ड) ताम्हिणी घाट
  इ) तुंग व तिकोना व लोहगड किल्ला